मुंबई : अनेकांना सर्दी ही बाराही महिने असलेली समस्या आहे. अनेकदा काही थंड खाल्यामुळे तर काही वेळेस व्हायरल इनफेक्शनमुळे सर्दीची समस्या येते. सर्दी झाली की आपण लगेच मेडिकल मध्ये जावून गोळी आणतो आणि सर्दीवर त्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात घेतो.
सर्दीवर तुम्ही काही घरगुती उपाय देखील करु शकता.
१. कांदा आणि लसूण खाणे - कांदा आणि लसूण या 2 पदार्थांना वर्ज्य मानले जाते पण आयुर्वेदात तसे त्याचे खूप फायदे सांगण्यात आले आहे. दोघांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. कांदा आणि लसूण हे दोन्हीही जंतुविरोधी आहेत. भरपूर पाणी किंवा द्रव पदार्थ प्राशन करणे हा एक चांगला उपाय सर्दीवर मानला जातो.
२. पाण्याची वाफ - सर्दीवरचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे वाफ घेणे. एका धातुच्या भांड्यात पाणी घ्यावे, त्याला भरपूर उकळावे. पाणी उकळल्यानंतर ते चिनी मातीच्या भांड्यात घ्यावे. उकळलेले पाणी असलेले भांडे टेबलवर ठेवावे आणि खुर्चीवर बसून डोक्याभोवती टॉवेल घेऊन या भांड्यातल्या पाण्याची वाफ नाकावाटे आत घ्यावी. यामुळे सर्दी कमी होते.
३. धुम्रपान टाळावे - दारुमुळे सर्दी वाढते. सर्दी झाल्यावर धूम्रपान करणं टाळावे. व्हायरलं इनफेक्शन होऊ नये म्हणून नाकावर मास्क लावावे. गर्दीच्या ठिकाणी ज्याव्यक्तीला सर्दी झाली आहे त्या व्यक्तीपासून लांब राहावे.