मुंबई : आपला आहार ऋतूनुसार असावा. सध्या थंडीचा मोसम आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याला अत्यंत पोषक अशी फळे खावीत. प्रत्येक फळाचे गुणधर्म वैशिष्ट्यपूर्ण असते. ही फळे आरोग्यवर्धक आहेत.
चिंच :
- पिकलेली चिंच मलावरोधही दूर करते.
- पचन करणं, रुची वाढवणं हाही चिंचेचा औषधी गुणधर्म
- दारूची नशा उतरविण्यासाठी पिकलेली चिंच कोमट पाण्यात भिजवून, बारीक करावी आणि पाणी मिसळून त्यात थोडा गूळ विरघळून प्यायला द्यायचे. हृदयाची दाहकता, जळजळ कमी होते.
- पाय मुरगळला असेल तर चिंचेची ताजी पाने उकळून घेऊन ती त्या जागी लावायची. लगेच परिणाम जाणवतो.
- गळ्याला सूज आली असेल तर १० ग्रॅम चिंच घेऊन एक लिटर पाण्यात घालायची. त्यात थोडे गुलाबजल मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
आवळा :
- आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते.
- रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारा म्हणून जास्त ओळख
- आम्लपित्त आणि अॅसिडिटी कमी होण्यास मदत.
- आपळा पित्तशामक असतो.
- केसांसाठी, डोळ्यांसाठी, त्वचेसाठीही फायद्याचा असतो.
- आवळ्यापासून च्यवनप्राशसारखी काही औषधेही तयार करतात
- वार्धक्य लांबवणं हे आवळ्याचं प्रमुख काम
- शरीराला टवटवीतपणा देतो, तारुण्य देतो.
- प्रेग्नंटच्यावेळी स्त्रीला उलटी आणि मळमळ वारंवार होत असते. अशा वेळी आवळा सुपारी, कँडी तसेच सरबत घ्यावे.
- नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढते.
ऊस :
- ऊस हा पित्तशामक आहे.
- ऊस लघवीचे प्रमाण वाढवणारा असतो.
- मूतखडा वगैरे लघवीच्या संदर्भातले सगळे विकार ऊस दूर करतो.
- शरीरातील सर्व विषाक्त पदार्थ धुतले जातात.
- थंड गुणाचा आणि बलकारक असा ऊस असतो.
बोरे :
- बोरे अग्निप्रदीपक असतात.
- चवीला रुचकर, पचण्यास हलके असते. ते मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते,
- वातदोषास कमी करते, जुलाब थांबवते
- या रानफळांमधून व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.