भारतात पुरुषांच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष

भारतात आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम तसेच अनेक सरकारी योजना राबविल्या जातात. पण, हे कार्यक्रम बऱ्याचदा स्त्रिया आणि लहान मुलांना केंद्रस्थानी ठेऊन आयोजित केले जातात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 30, 2014, 01:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतात आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम तसेच अनेक सरकारी योजना राबविल्या जातात. पण, हे कार्यक्रम बऱ्याचदा स्त्रिया आणि लहान मुलांना केंद्रस्थानी ठेऊन आयोजित केले जातात. त्याचमुळे की काय पण, भारतात पुरुषांच्या स्वास्थ्याकडे कमी लक्ष दिलं जातं, असं डॉक्टरांना वाटतं.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, भारतातील पुरुषांच्या स्वास्थ्याकडे खूप दुर्लक्ष केलं जातं. कँसर आणि हृदयरोगाशी निगडीत रोगांशी तसंच जीवनशैली संबंधित आजारांच्या बाबतीत महिलांच्या तुलनेत दोन ते चार टक्क्यांपर्यंत अधिक जोखिम पत्करतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशात जास्तीत जास्त स्वास्थ्य कार्यक्रम हे संसर्गजन्य रोग, लहान मुलं आणि महिलांच्या स्वास्थ्याकडे लक्ष देतात. आरएमएल हॉस्पीटलच्या एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात पुरुषांचं सरासरी आयुष्य महिलांच्या तुलनेत पाच वर्ष कमी असतं. कँसर, हृदयरोग आणि जीवनशैली यांच्याशी निगडीत आजार पुरुषांना महिलांच्या तुलनेत दोन ते चार टक्के अधिक प्रमाणात सतावतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.