प्लम भरपूर जीवनसत्व असलेलं फळ

निळ्या रंगाचं प्लम हे फळ तुम्ही कधी खाल्लंय का, याला हिंदीत आलुबुखार म्हणतात. असं म्हणतात की, एका टोपली फळांमध्ये जेवढे जीवनसत्व असतात, तेवढे एका प्लममध्ये असतात.

Updated: Nov 15, 2015, 11:20 AM IST
प्लम भरपूर जीवनसत्व असलेलं फळ title=

पॅरिस : निळ्या रंगाचं प्लम हे फळ तुम्ही कधी खाल्लंय का, याला हिंदीत आलुबुखार म्हणतात. असं म्हणतात की, एका टोपली फळांमध्ये जेवढे जीवनसत्व असतात, तेवढे एका प्लममध्ये असतात.

प्लम अनेक पोषक तत्वांनी आणि मिनरल्स असलेलं फळ आहे. यात विटामीन, कॅल्शियम, मॅग्नेशिअम, कॉपर, आर्यन, पोटॅशियम आणि फायबर त्यात असतात.

प्लम कॅन्सर पेशंट, डायबेटीज आणि वजन कमी करण्यासाठी लाभदायक आहे. 

अस्थिभंगचा धोका टळतो
प्लम फळाचं सेवन रोज केल्यास अस्थिभंग सारखे प्रकार होत नाहीत, वय वाढल्यानंतर अस्थिभंगचा धोका वाढतो, महिलांनी मोनोपॉजनंतर हे फळ खाणे कधीही फायदेशीर असेल, यामुळे ऑस्टियोपोरेसिस आणि अचानक हाड मोडण्याचा धोका टळतोय

प्लममध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं, यामुळे पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते, पोटांच्या आतड्यांना आराम देणारं हे फळ आहे.

प्लममुळे फॅटस वाढत नाहीत, वजन नियंत्रणात आणण्यास मदत होते. विटामिन-ए, डोळ्यांना निरोगी ठेवण्यास नेहमी फायदेशीर ठरतं.झिया एक्साथिन नावाचं फायबर प्लममध्ये असतं, जे डोळ्यांच्या रेटिनाला मजबूत करतं.

हे लक्षात असू द्या...
अॅनेमिया- रक्ताची कमतरता असणाऱ्यांना हे फायदेशीर आहे, अॅटीऑक्सीडेंट असल्याने शरीरारातील रोग प्रतिकारक क्षमताही वाढते. कोणतीही व्यक्ती हे फळ खाऊ शकते, मात्र सर्दी झालेल्या व्यक्तीने हे फळ खाणे टाळावे, दिवसात हे फळ १०० ते १५० ग्रॅम खाण्यास हरकत नाही, ज्या सिझनमध्ये हे फळ येतं तेव्हाच ते खाल्ल तर योग्य असेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.