मलेरियावर उपचार करणार हे डास

मलेरिया सारख्या आजारावर संशोधन करत असलेल्या अमेरिकेतील संशोधनात शास्त्रज्ञांनी अशाप्रकारचे डास तयार केले आहे जे मलेरिया रोखू शकतात. 

Updated: Nov 29, 2015, 11:53 AM IST
मलेरियावर उपचार करणार हे डास title=

कॅलिफोनिया : मलेरिया सारख्या आजारावर संशोधन करत असलेल्या अमेरिकेतील संशोधनात शास्त्रज्ञांनी अशाप्रकारचे डास तयार केले आहे जे मलेरिया रोखू शकतात. 

या शास्त्रज्ञांनी असे डास तयार केलेत की ज्यामुळे मलेरिया पसरविणाऱ्या डासांना ते कमी करू शकतील. अमेरिकेतल्या पीएनएएस या मासिकांत ही माहिती देण्यात आलीय. 

सिगारेटपेक्षा ही जास्त घातक 'डासांची अगरबत्ती

मलेरियांवर अनेक उपचार उपलब्ध असतानाही मलेरियामुळे वर्षाला तब्बल सहा लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतातही हे प्रमाण काही कमी नाही. 

मलेरिया आजारावर मात करण्यासाठी अमेरिकेलीत शास्त्रज्ञांनी 'क्रिस्पर' या विशिष्ट पध्दीतीव्दारे डासांच्या डीएनएमध्ये मलेरियाला प्रतिरोध करणारे जीन टाकले. यामुळे मलेरिया पसरवणाऱ्या डासांना पूर्णपणे नष्ट करता येत नसले तरी काही प्रमाणात आळा बसेल असा विश्वास या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.