तुमची स्कीन उजळवण्यासाठीही उपयोगी आहे 'व्होडका'!

हार्ड ड्रिंक घेताना अनेकांची 'व्होडका' ही फर्स्ट चॉईस असते... अनेकांच्या आवडीचं हे पेय... या अल्कोहोलिक ड्रिंकचे अनेक गुण आणि इतर अल्कोहोलसोबत मिळून बनवलं गेलेलं कॉकटेल अनेकांचा वेळ 'स्पेशल' बनवतं. 

Updated: Sep 12, 2015, 07:58 PM IST
तुमची स्कीन उजळवण्यासाठीही उपयोगी आहे 'व्होडका'! title=

मुंबई : हार्ड ड्रिंक घेताना अनेकांची 'व्होडका' ही फर्स्ट चॉईस असते... अनेकांच्या आवडीचं हे पेय... या अल्कोहोलिक ड्रिंकचे अनेक गुण आणि इतर अल्कोहोलसोबत मिळून बनवलं गेलेलं कॉकटेल अनेकांचा वेळ 'स्पेशल' बनवतं. 

अधिक वाचा - ६ खास टिप्स: दाट, मऊ आणि चमकदार केसांसाठी

परंतु, याच व्होडकामध्ये अनेक औषधी गुणही आढळतात. जर तुम्ही केवळ एक अल्कोहोलयुक्त पेय म्हणून याकडे पाहत असाल तर याचा अर्थ आहे की याचे औषधी गुणधर्म तुमच्यापर्यंत अद्याप पोहचलेले नाहीत. 

पाहा, कसं बहुउपयोगी ठरतं 'व्होडका'...
- स्किन उजळवण्यासाठी
जर तुम्हाला तुमची त्वचा हेल्दी आणि ग्लोईंग बनवायची असेल तर व्होडका एका कापसाच्या बोळ्यावर घेऊन त्यानं तुमचा चेहरा साफ करा... दररोज असा प्रयोग केल्यास तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसू लागेल.

- शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर...
मार लागलेल्या ठिकाणी किंवा सुजलेल्या ठिकाणी आराम मिळण्यासाठीही व्होडका उपयोगी ठरतो. यासाठी, थंड पाण्यात थोडा व्होडका मिसळून त्याचं बर्फात रुपांतर करून घ्या. हा व्होडकायुक्त बर्फ लागलेल्या ठिकाणी लावल्यानंतर काही वेळातच तुम्हाला आराम मिळेल. 

- बूट चमकावण्यासाठी...
जर तुमची बूट खूप घाण झाले असतील आणि त्यांना पॉलिश करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर थोडा व्होडका या बुटांवर स्पे करा आणि एखाद्या कपड्यानं बूट साफ करून घ्या... तुम्हाला चकाकणारे बूट दिसतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.