उन्हाळ्यात सुंदर त्वचेसाठी ५ उपाय

उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण तीव्र सूर्यकिरणांमुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. पार्लरमध्ये जाऊन ब्यूटी ट्रीटमेंट घेणे हा त्यावरचा हमखास उपाय असला तरी नेहमी पार्लरमध्ये जाणं वेळखाऊ आणि पैसे खाऊ देखील आहे.

Updated: May 3, 2016, 05:11 PM IST
उन्हाळ्यात सुंदर त्वचेसाठी ५ उपाय title=

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण तीव्र सूर्यकिरणांमुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. पार्लरमध्ये जाऊन ब्यूटी ट्रीटमेंट घेणे हा त्यावरचा हमखास उपाय असला तरी नेहमी पार्लरमध्ये जाणं वेळखाऊ आणि पैसे खाऊ देखील आहे.

उन्हाळ्यात मात्र हमखास घराघरात असणारी आंबा आणि कलिंगड ही फळे तुम्हाला उपयोगी पडू शकतात. घरच्याघरी कोणताही खर्च न करता तुम्ही तुमच्या स्कीनचा गेलेला ग्लो परत मिळवू शकता आणि उन्हाळ्यातही सुदंर त्वचा राखू शकता.

१. टरबूज किवा कलिंगड खाल्यामुळे उन्हाळ्यात अनेक फायदे होतात. टरबूज त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. तसेच ते चेहर्‍याचा कोरडेपणाही दूर करतात. कलिंगड खाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण चांगली राहते आणि त्यामुळेही त्वचा फ्रेश दिसते.

२. १ वाटी कलिंगडाच्या रसात दोन चमचे कणिकचा कोंडा आणि १ चमचा मिल्क पावडर घालून केलेलं मिश्रण चेहरा, मान, गळा आणि हातापायावर लावा. १० मिनिटांनंतर चेहरा साफ करा.

३. १ चमच कलिंगड रसात १ चमच दही घालून तो चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिटांनंतर साध्या पाण्याने धुवा, त्वचेवर ताजेपणा आलेला जाणवेल.

४. आंबाही त्वचा रक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. दोन चमचे आंब्याच्या रसात थोडी साखर घालून चेहरा आणि हातपायावर चोळून लावा. नंतर हलक्या हाताने धुवा. आठवड्यातून एक वेळा जरी हा उपाय केला तरी मृत त्वचा निघून जाते आणि चेहरा चमकतो.

५. आंब्याची कोय उकडून आतील गर कुसकरा. त्यात दोन चमचे मुल्तानी माती घालून हे मिश्रण चेहरा, हातापायांवर लावा. ३० मिनिटं वाळण्यासाठी ठेवा. पाण्याने धुतल्यानंतर त्वचा अतिशय कोमल झालेली दिसेल.