जम्मू-काश्मीरमध्ये कुलगामच्या पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा गोळीबार

दहशतवाद्यांनी मंगळवारी कुलगामच्या यारीपोरामध्ये पोलीस स्टेशनवर फायरिंग केलंय. या हल्ल्यात कुणालीही इजा झाल्याची अद्याप बातमी नाही.

Updated: Oct 4, 2016, 11:18 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये कुलगामच्या पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा गोळीबार

श्रीनगर : दहशतवाद्यांनी मंगळवारी कुलगामच्या यारीपोरामध्ये पोलीस स्टेशनवर फायरिंग केलंय. या हल्ल्यात कुणालीही इजा झाल्याची अद्याप बातमी नाही.

या हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं या भागाला वेढा घालून दहशतवाद्यांचा शोध सुरू केलाय. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सेनेच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर पुन्हा हल्ले सुरू झालेत. संपूर्ण खोऱ्यात सुरक्षा दलाला हायअलर्ट देण्यात आलाय. 

दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील एका पोलीस चौकीमधून सोमवारी रात्री काही संदिग्ध दहशतवादी पाच रायफल घेऊन फरार झाले होते. ही घटना लक्षात येताच पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केलीय.