भ्रष्टाचार का थांबत नाही? - राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष  राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करतांना म्हटलं आहे की, आपण सरकारमध्ये आल्यानंतरही भ्रष्टाचार का थांबत नाही, यासाठी राहुल गांधी यांनी मोदी काय बोलले होते याची आठवण देखील करून दिली आहे.

Updated: Jul 9, 2015, 07:08 PM IST
भ्रष्टाचार का थांबत नाही? - राहुल गांधी title=

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष  राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करतांना म्हटलं आहे की, आपण सरकारमध्ये आल्यानंतरही भ्रष्टाचार का थांबत नाही, यासाठी राहुल गांधी यांनी मोदी काय बोलले होते याची आठवण देखील करून दिली आहे.

"आपले पंतप्रधान म्हणाले होते 'ना खाऊंगा ना खाने दूँगा', मग राजस्थान आणि मध्य प्रदेश उघडपणे होत असलेला भ्रष्टाचार का थांबत नाही?, ललित मोदी का सापडत नाहीत?', असा सवाल राहुल गांधी यांनी आज उपस्थित केला.

नरेंद्र मोदी यांना दिलेली आश्‍वासने पाळावीत तसेच देशाला भ्रष्टाचारमुक्त करावे याची आठवणही गांधी यांनी यावेळी करून दिली. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.