एअर इंडियाचं विमान हायजॅक झालं? एकच गोंधळ

केरळची राजधानी तिरूअनंतपूरमच्या विमानतळावर आज एक जबरदस्त तमाशा झाला, जेव्हा एका पायलटने विमानतळ अधिकाऱ्यांना विमान `हायजॅक` झाल्याचा संदेश पाठवला.

Updated: Oct 19, 2012, 01:57 PM IST

www.24taas.com, तिरुअनंतपूरम
केरळची राजधानी तिरूअनंतपूरमच्या विमानतळावर आज एक जबरदस्त तमाशा झाला, जेव्हा एका पायलटने विमानतळ अधिकाऱ्यांना विमान `हायजॅक` झाल्याचा संदेश पाठवला आणि सगळीकडे एकच खळबळ माजली. आणि त्याने हा संदेश एअर ट्रॅफिक कंट्रोलरला पाठविल्याने सगळ्यांचाच जीव टांगणीला लागला...
स्थानिक पत्रकारांच्या रिपोर्टनुसार एअर इंडियाचे एक विमान अबू धाबी वरून कोच्चीला चाललं होतं. पण काही तांत्रिक अडचणीमुळे विमान तिरूअनंतपूरमच्या दिशेने फिरविण्यात आलं होतं. विमानाचा रस्ता बदलल्याने पायलटकडून माहिती मिळविण्यासाठी आणि त्याला विरोध करण्यासाठी विमानातील प्रवाशांनी हुल्लडबाजी करण्यास सुरवात केली. त्यातील अनेक जणांनी पायलटच्या कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे परिस्थितीची कल्पना न आल्याने पायलटने विमान हायजॅक करण्यात आल्याचा निरोप त्याने विमातळावरील अधिकाऱ्यांना कळवला.. आणि त्यानंतर तिरूअनंतपूरम विमानतळावर विमानाचं इर्मेजन्सी लॅंडिंग करण्यात आलं.