मुंबई : अश्लील थट्टा आणि लोकांवर जोक्स करण्यासाठी प्रसिद्ध सोशल मीडिया ह्यूमर कंपनी All India Bakchod ने सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली आहे. या संदर्भात एक व्हिडिओ त्यांनी आपल्या पेजवर शेअर केला आहे.
या व्हिडिओत पीएम मोदी स्टेजवर उभे आहेत आणि एक आफ्रिकन महिला त्यांच्या स्वागतामध्ये स्वत:च्या भाषेत काही उच्चारण करत आहे. या घटनेचा व्हिडिओत तयार करून पोस्ट करण्यात आला आहे. मोदींच्या आफ्रिका येथील प्रवासाला टार्गेट करत All India Bakchod कडून हे व्हिडिओ प्रस्तुत केले गेले आहे. यात जोहान्सबर्ग भेटीवेळी काढण्यात आलेले व्हिडिओ एडिट करून विकृत पद्धतीने टाकले आहेत.
उल्लेखनीय आहे की या कार्यक्रमात मोदींनी 15 हजार भारतीयांना ‘केम छो’ म्हणत त्यांची विचारपूस केली होती. प्रत्युत्तरात सर्वांनी जोशपूर्ण शैलीत उत्तर दिले होते. एवढंच नव्हे तर मोदी येथे आल्यावर मोदी-मोदी अशा आवाजाने पूर्ण परिसर गाजले होते.