नवी दिल्ली : पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे राहुल गांधी, मुलायम सिंग, मायावती आणि केजरीवालांच्या पोटात का दुखतंय असा सवाल भाजप अध्यक्ष अमित शहांनी विचारला आहे.
काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा आणि दहशतवाद पसरवणाऱ्यांना या निर्णयामुळे चाप बसला आहे. पण विरोधकांनी याला विरोध करून त्यांचा खरा चेहरा दाखवला आहे, असंही अमित शहा म्हणाले आहेत.
या निर्णयामुळे सामान्यांना त्रास होत आहे याची कल्पना आहे पण देशहितासाठी नागरिकांनी थोडा त्रास सहन करावा असं आवाहनही अमित शहांनी केलं आहे.