'कृष्णा'च्या लग्नात अमेरिकेहून आली त्याची फेसबूकवरील 'यशोदा'

गोरखपूर : फेसबूकवर अनेक नाती तयार होतात. 

Updated: Jan 31, 2016, 12:11 PM IST
'कृष्णा'च्या लग्नात अमेरिकेहून आली त्याची फेसबूकवरील 'यशोदा' title=

गोरखपूर : फेसबूकवर अनेक नाती तयार होतात. कोणाला मित्र मिळतो, कोणाला मैत्रीण. कोणाला आयुष्याचा साथीदार, तर कोणाला गुरू. पण, कोणाला आई मिळाली अशी घटना तुम्ही ऐकली आहे का? हो. हे घडलंय उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरात.

गोरखपूरमध्ये राहणाऱ्या कृष्ण मोहन त्रिपाठीची डेब मिलर या कॅलिफोर्नियात राहणाऱ्या अमेरिकी महिलेशी चार वर्षांपूर्वी फेसबूकवर ओळख झाली. कृष्णाची आई तो लहान असतानाच वारली. डेबलाही मुलं झाली नाहीत. या दुव्यामुळे ते दोघे एकमेकांच्या जवळ आले. आपले सुख-दुःख एकमेकांपाशी बोलायला लागले. यातून त्यांच्यात आई मुलाचं नातं निर्माण झालं. डेबने कृष्णाला आपला मुलगा मानलं.

गेल्या आठवड्यात कृष्णाच्या लग्नाची तारीख होती. आपल्या या लग्नाचं त्याने डेबला आमंत्रण दिलं आणि आश्यर्याची बाब म्हणजे डेब या लग्नासाठी अमेरिकेहून भारतात आली. डेब या लग्नाला आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

येताना डेब नुसतीच आली नाही तर विवाहित जोडप्यासाठी २५ लाखांचे सोन्याचे दागिनेही तिने आणले. डेबने आता आपल्या मुलाला आणि सुनेला अमेरिकेला तिच्या घरी येण्याचं निमंत्रणही दिलंय.

इतकंच काय तर डेबने आपल्या मुलाच्या लग्नात बनारसी साडीही नेसली होती. आता आपल्या घरी नेण्यासाठी तिने दोन डझन साड्या विकत घेतल्या आहेत. कृष्ण सध्या अवध विद्यापीठातून एमएससी करत असून त्याला वकील होण्याची इच्छा आहे.