राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीला आयएसआयची मदत असल्याचं वक्यव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी केलं होतं. त्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. तसेच समाजवादी पक्षानेही राहुल गांधींवर जातीयवादी असल्याची टीका केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 26, 2013, 07:41 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, कटक
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीला आयएसआयची मदत असल्याचं वक्यव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी केलं होतं. त्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. तसेच समाजवादी पक्षानेही राहुल गांधींवर जातीयवादी असल्याची टीका केलीय.
राहुल गांधी यांनी उत्त्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीबाबत खळबळजनक विधान करून नव्या वादाला तोंड फोडलंय. मुजफ्फरनगरमधील दंगलीत जखमी झालेल्या लोकांच्या संपर्कात आयएसआय असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलंय. भारतीय गुप्तचर विभागातील अधिका-यांनी ही माहिती आपल्याला दिली असल्याचही त्यांनी सांगितलंय.
राहुल गांधींच्या या वक्तव्याचा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाचार घेतला आहे. तर भाजपने राहुल यांच्या विधानावर आक्षेप नोंदविला आहे. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी करताना त्यांच्याविरोधात तक्रार नोंदविली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.