बंगळुरूत २२ वर्षीय कॉल सेंटरमधील महिला कर्मचाऱ्यावर गँगरेप

 गँगरेपच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यात आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली. बंगळुरूत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून ते त्या नराधमांचा शोध घेत आहेत.

PTI | Updated: Oct 6, 2015, 11:21 AM IST
बंगळुरूत २२ वर्षीय कॉल सेंटरमधील महिला कर्मचाऱ्यावर गँगरेप  title=

बंगळुरू:  गँगरेपच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यात आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली. बंगळुरूत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून ते त्या नराधमांचा शोध घेत आहेत.

आणखी वाचा - मुंबईत चेंबुर भागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघड

शनिवारी रात्री १०च्या सुमारास आपल्या ऑफिसमधून घरी जायला निघालेली तरुणी आपल्या गाडीची वाट पाहात होती. काही वेळानं तिथं दोन अज्ञात तरुण आले त्यांनी गाडी थांबवली. गोड बोलून त्यांनी तिला लिफ्ट दिली.

आणखी वाचा - क्रूर बापानं आईसमोरचं चिमुरडीला जमिनीवर आपटून ठार केलं!

पण घडलं भलतंच... घरी सोडण्याऐवजी ते तरुणीला शांत ठिकाणी घेऊन गेले. तिथं दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर दक्षिण पूर्व बंगळुरूच्या मदीवाला भागात तिला सोडून दिलं. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.