बलात्कार करवण्याची TMC खासदाराची धमकी

  तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये पाल विरोधकांना धमकी देत आहेत. हत्या आणि बलात्कार करण्याची धमकीच ते विरोधकांना देत आहेत.

Updated: Jul 1, 2014, 12:02 PM IST
बलात्कार करवण्याची TMC खासदाराची धमकी   title=

कृष्णानगर:  तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये पाल विरोधकांना धमकी देत आहेत. हत्या आणि बलात्कार करण्याची धमकीच ते विरोधकांना देत आहेत.

एका झाडाखाली होत असलेल्या सभेत कृष्णानगरचे खासदार पाल म्हणाले, “जर कोणी टीएमसीच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर मी स्वत: त्याला गोळी मारील.” पाल पुढं म्हणतात, “मी खूप मोठा गुंड आहे आणि जर कोणी टीएमसीच्या लोकांना धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर मी त्या कुटुंबाचं आयुष्यच उद्ध्वस्थ करील.”

पाल बेजबाबदारपणे पुढं म्हणाले, “जर कोणी स्त्रियांना हात लावला तर मी माझे लोक पाठविल आणि रेप करविल.” तृणमूल काँग्रेसनं पालच्या या वक्तव्याचा निषेध केलाय. पक्षाचे नेते डेरेक ओ ब्रायन म्हणाले, आमचा पक्ष अशाप्रकारच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.