www.24taas.com,नवी दिल्ली
सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांच जोरदार राडा झाला आहे. आंदोलक करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पाणी मारा करून उपयोग न झाल्याने अश्रुधुराचा मारा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक गेली. त्यामुळे या ठिकाणचे वातावरण तापले आहे. दरम्यान, अण्णा हजारे आणि बाबा रामदेव हेही आंदोलनात उतरल्याने मोठी गर्दी झाली आहे.
विजय चौक, रायसीना हिल्स, राजपथ, अशोक रोड, मानसिंग रोड आदी भागांमध्ये मोठी गर्दी होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सात मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. या परिसरात वृत्तवाहिन्यांना वार्तांकनास बंदी घालण्यात आली आहे.
सामूहिक बलात्कार प्रकरणी कोणत्याही राजकीय झेंड्याविना शेकडोंच्या संख्येनी जमलेल्या तरुणाईने केंद्र सरकारला झुकण्यास भाग पाडले. धावत्या बसमध्ये बलात्कार करणाऱ्या नराधमांबाबत दिल्ली पोलिसांनी दाखवलेली अक्षम्य हलगर्जी सरकारने मान्य केली. दिल्ली पोलिसांची न्यायालयीन आयोगामार्फत चौकशीचे आश्वा्सन सरकारने दिले. या प्रकरणी सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. शिवाय, बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यासाठी कायद्यात आवश्यगक सुधारणांसाठी चर्चेची तयारीही सरकारने दाखविली आहे.
सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करत विजय चौक, रायसीना हिल्स परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट दिली. मध्यरात्री १.००वाजत्या त्या घराबाहेर पडल्यात. आजही सोनिया यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, ठोस आश्वासन मिळाले नाही.
१० जनपथबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सोनिया गांधी यांनी रात्री १५ मिनिटे चर्चा केली. यावेळी शांत राहा, असे आवाहन सोनिया गांधी सांगितले, कारवाई केली जाईल. उद्या सकाळी भेट घेईन. मात्र, आज सकाळी भेट घेतल्यानंतर ठोस आश्वासन मिळाले नाही. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनीही चर्चा केली. परंतु आंदोलन कर्त्यांची आश्वासनावर बोलवण केली केली. त्यामुळे नाराजीचा सूर कायम असल्याचे दिसून आले.