www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुका सहा टप्प्यात एप्रिल- मे महिन्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २० एप्रिलनंतर निवडणुका सुरू होती असता अंदाज वर्तविण्यात येत आहे.
रामनवमी, बैसाखी, बिहू आणि गुड फ्रायडेच्या छुट्ट्यांमुळे निवडणूक आयोगाने २० एप्रिलनंतर लोकसभा निवडणुका घेण्याची योजना तयार केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात १० मार्चपर्यंत निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे २० एप्रिल ते १५ मेपर्यंत ६ टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार निवडणूक प्रक्रिया १५ मेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होणार आहे. तोपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार आहे. निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. १ जूनच्या आत केंद्रात नव्या सरकारची स्थापना होणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे या वर्षी लोकसभा निवडणुका सुमारे १ लाख २० लाख जवांनांच्या सुरक्षेत पार पडणार आहे. या निवडणुकीत सुमारे ८१ कोटी ४० लाख मतदार आपला मतदानाचा आधिकाराचा उपयोग करणार आहे. ही संख्या गेल्या लोकसभेच्या ९ कोटी ७० लाख अधिक आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.