संमेलन ठिकाणी वाद अयोग्य, वारकरी साहित्य मुख्य प्रवाह - सदानंद मोरे

 नवभांडवलवादाशी लढा देताना, संतांनी सांगितलेल्या मार्गानेच लढा द्यावा लागेल, प्रतिपादन करीत साहित्य संमेलनाच्या ठिकाणी वाद अयोग्य असल्याचं सांगत, वारकरी साहित्य हेच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह असल्याचं सदानंद मोरेंनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

Updated: Apr 3, 2015, 07:12 PM IST
संमेलन ठिकाणी वाद अयोग्य,  वारकरी साहित्य मुख्य प्रवाह - सदानंद मोरे title=

संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरी, घुमान, पंजाब : नवभांडवलवादाशी लढा देताना, संतांनी सांगितलेल्या मार्गानेच लढा द्यावा लागेल, प्रतिपादन करीत साहित्य संमेलनाच्या ठिकाणी वाद अयोग्य असल्याचं सांगत, वारकरी साहित्य हेच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह असल्याचं सदानंद मोरेंनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

संत नामदेवांच्या कर्मभूमीत ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. टाळ मृदुंग आणि भांगड्याच्या सुरात पंजाबमध्ये घुमानमध्ये मराठी साहित्य संमेलनाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. माजी संमेलनाध्यक्ष फ मु शिंदे यांच्याकडून, संत साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी संमेलनाध्यक्षाची धुरा स्वीकारली. 

संमेलनाला घुमानसारखे ठिकाण देशात नाही. नेमाडे, कोल्हाटकर यांनी उत्तम साहित्य निर्माण केले. संस्कृतमध्ये असलेली गीता अन्य भारतीय भाषेत सर्वांत प्रथम आणली संत ज्ञानेश्वरांनी आणली. पंडिती काव्य सर्वसमावेशक साहित्य नाही. तर वारकरी साहित्य हा मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह आहे. पंजाब-महाराष्ट्राचे नातं प्रेरणादायी आणि ऐतिहासिक आहे. तुकाराम सर्वश्रेष्ठ, असे ब्रिटिश अधिकारी हंटरने म्हटले आहे. हिंदु्स्थान सर्वात आधी, ही भूमिका मराठ्यांची आहे. महाराष्ट्रासह पंजाबात धर्म आणि राजकारण हातात हात घालून चालतात, असे उल्लेख करुन सदानंद मोरे म्हणालेत,  धर्मामधील कर्मठांवर संत नामदेवांनी टीका केली. संत नामदेवांची प्रेरणा धर्माच्या पलिकडची आहे.

साहित्य संमेलनाच्या ठिकाणी वाद अयोग्य असल्याचं सांगत, वारकरी साहित्य हेच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह असल्याचं सदानंद मोरेंनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. महाराष्ट्र आणि पंजाबची  परंपरा सारखी अससल्याचंही त्यांनी सांगितलं. साहित्य संमेलनासाठी संत नामदेवांची कर्मभूमी असलेलं घुमानचं साहित्य संमेलनासाठी अत्यंत योग्य असल्याचंही ते भाषणात म्हणाले.

डॉ. सदानंद मोरे यांचे अध्यक्षपदही यथोचित आहेत. मात्र, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा  दिला पाहिजे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणालेत, पंजाब देशासाठी नेहमीच धावून आला आहे. संमेलन पंजाबमध्ये होत असल्याचा आनंद आहे. भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य म्हणजे मराठी साहित्याचा खजिना आहे. मराठी ही ज्ञान भाषेसह विज्ञान भाषा होणे गरजेचे आहे.  मुंबई, पुणे, नागपुरात मराठी टक्का घसरतो आहे, अशी चिंता यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली.

 
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.