नवी दिल्ली : देशातील जवळपास 1 कोटी लोकांना केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी मिळू शकते. पुढच्या 2 दिवसांमध्ये कॅबिनेटमध्ये सातव्या वेतन आयोग लागू होवू शकतो अशी सुत्रांची माहिती आहे. बुधवारी होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होऊ शकतो.
सातवा वेतन आयोग लागू झाल्यास याचा फायदा 1 कोटी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेंशनमध्ये जवळपास 24 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
सातव्या वेतन आयोगाचा निर्णय बुधवारी झाल्यास ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात वाढीव पगार मिळू शकतो. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात यामुळे 23 टक्क्यांनी वाढ होणार आहे.