दिल्ली, हैदाराबादमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत

राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्याचवेळी दक्षिणेकडील हैदराबादमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसामुळे दोन्ही ठिकांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

PTI | Updated: Aug 31, 2016, 02:23 PM IST
दिल्ली, हैदाराबादमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्याचवेळी दक्षिणेकडील हैदराबादमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसामुळे दोन्ही ठिकांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पावसामुळे दिल्लीतल्या सखल भागात पाणी साचल्यानं आज सकाळपासून वाहनांची मोठी कोंडी बघायला मिळतेय. सामन्य जनजीवनाचे आज सकाळपासून पुरते बारा वाजलेत. ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्यानं गुरुग्राम ते दिल्ली वाहतुकीचा मोठा खोळंबा झालाय. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांना आज पुन्हा एकदा या पावसाचा फटका बसला. 

दिल्लीसह गाझियाबाद आणि नोएडा येथेही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे राजधानीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मुसळधार पावसामुळे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरील उड्डाणे विलंबाने, एक विमान जयपूर येथे वळवण्यात आले.

दरम्यान, पावसामुळे हैदराबाद शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे चौघांचा मृत्यू झाला असून यामधील तिघांचा मृत्यू भिंत कोसळल्याने झाला आहे. मुशीराबादमध्ये ही घटना घडली. ठिकठिकाणी पाणी साचले असून अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी झाली आहे.