जेटलींच्या बजेटमधून सर्वसामान्यांना काय ?

अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं. या बजेटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय घेतले आहेत

Updated: Feb 29, 2016, 01:00 PM IST
जेटलींच्या बजेटमधून सर्वसामान्यांना काय  ? title=

नवी दिल्ली: अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं. या बजेटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय घेतले आहेत, त्यावर एक नजर टाकूयात. 

बजेटमधले सर्वसामान्यांसाठीचे महत्त्वाचे 10 मुद्दे

1) छोट्या करदात्यांना जेटलींचा दिलासा, कररचनेमध्ये कोणताही बदल नाही

2) करसवलतीची मर्यादा 2.5 लाखांवरच

3) 5 लाखांच्या उत्पन्नामध्ये 3 हजारांची सूट

4) 2 करोड लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 3 हजारांची सूट मिळणार

5) हाऊस रेन्ट अलावन्स 24 हजारांवरून 60 हजारांवर

6) पहिल्या गृहकर्जासाठी व्याजदरात सवलत

7) पहिल्यांदा घर खरेदी केल्यावर 50 लाख रुपयांपर्यंतच्या घरांवर ५० हजारांपर्यंतची सूट

8) 50 वर्गमीटरवर हाऊसिंग स्कीमवर सर्व्हिस टॅक्स लागणार नाही

9) सबसिडी आणि सुविधा आधारनुसारच

10) 1 कोटी पर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांचा सरचार्ज 3 टक्क्यांनी वाढला