एक्सक्लुझिव्ह : पाटणा बॉम्बस्फोटात `आयएसआय`चा हात!

बिहारची राजधानी पटना इथं नुकत्याच झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटासाठी आर्थिक मदत आयएसआय पाठवल्याचा खुलासा झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 31, 2013, 04:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली / पाटणा
बिहारची राजधानी पाटना इथं नुकत्याच झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटासाठी आर्थिक मदत आयएसआय पाठवल्याचा खुलासा झालाय.
उच्चस्तरीय सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार झी मीडियाचे प्रतिनिधी दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिलीय. २७ ऑक्टोबर रोजी हुंकार रॅलीदरम्यान पाटण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी होते. या बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चा हात असल्याची माहिती आता समोर येतेय.
सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, ‘आयएसआय’नंच भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या रियाज भटकळला या बॉम्बस्फोटांसाठी तयार केलं होतं. रियाज भटकळ हाच पाटणा बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे.
दुसरीकडे एनआयएनं पाटणा बॉम्बस्फोटामध्ये मोहम्मद आफताब अन्सारी नावाच्या एका आरोपीला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडून एक लॅपटॉप आणि पाकिस्तानचं सिमकार्ड जप्त करण्यात आलंय. आफताबकडून जो लॅपटॉप मिळालाय त्यामध्ये त्याच्या मेलबॉक्सच्या ड्राफ्टमध्ये अनेक मेल सापडलेत जे पाठवलेच गेलेले नाहीत. दहशतवाद्यांजवळ इतरांचे पासवर्ड होते ज्याद्वारे ते ड्राफ्ट बॉक्समधील मेल वाचत होते, असं समजतंय.
‘एनआयए’ला आशा आहे की आफताबकडून मिळालेल्या लॅपटॉपमध्ये पाटणा ब्लास्टचा ब्लू प्रिंट असू शकतो. एनआयएचे सायबर एक्सपर्ट अधिक माहिती शोधून काढण्याच्या मागे लागलेत.

आफताब अन्सारी हा बिहारच्या मुजफ्फरपूरचा रहिवासी आहे. आफताब इम्तियाजसोबत सहभागी होऊन काम करत होता. इम्तियाज याअगोदरच पकडला गेलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.