स्वदेशी जीपीएसपासून आता भारत केवळ एक पाऊल दूर

भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'ने आज  IRNSS-1F या नॅव्हिगेशन उपग्रह प्रणालीतील सहाव्या उपग्रहाचं आंध्र प्रदेश येथील श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण केलं. PSLV C32 या यानाद्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण केलं गेलं. 

Updated: Mar 10, 2016, 04:14 PM IST
स्वदेशी जीपीएसपासून आता भारत केवळ एक पाऊल दूर title=

चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'ने आज  IRNSS-1F या नॅव्हिगेशन उपग्रह प्रणालीतील सहाव्या उपग्रहाचं आंध्र प्रदेश येथील श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण केलं. PSLV C32 या यानाद्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण केलं गेलं. 

या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठीचं ५४ तासांचं काऊंटडाऊन मंगळवारीच सतीश धवन अंतराळ केंद्रात सुरू झालं होतं. IRNSS-1F हा भारताच्या नॅव्हिगेशन प्रणालीतील एकूण सात उपग्रहांपैकी सहावा उपग्रह आहे. आजवर या प्रणालीतील IRNSS-1A, 1B, 1C, ID आणि 1E या उपग्रहांचं यापूर्वीच प्रक्षेपण करण्यात आलं होतं.

या प्रणालीमुळे भारताकडे अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीसारखी स्वदेशी बनावटीची आणि तितक्याच चांगल्या दर्जाची दिशादर्शक प्रणाली उपलब्ध होणार आहे. यातील सातव्या उपग्रहाचे प्रक्षेपण झाल्यानंतर भारताला कोणत्याही देशावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. 

या प्रणालीतील पहिला उपग्रह असणाऱ्या IRNSS-1Aचे जुलै २०१३ साली प्रक्षेपण झाले होते. त्यानंतर दर काही महिन्यांच्या फरकाने चार उपग्रहांचे प्रक्षेपण झालं. जानेवारी २०१५ मध्ये यातील पाचव्या उपग्रहाचे प्रक्षेपण झालं. 
यातील शेवटच्या म्हणजेच सातव्या उपग्रहाचे प्रक्षेपण २०१६च्या उत्तरार्धात करण्याचा इस्रोचा मानस आहे. 

इस्रोच्या या कामगिरीमुळे आता त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्वदेशी जीपीएसपासून भारत आता केवळ एक पाऊल दूर आहे. येत्या काही वर्षात जर तुमच्या मोबाईलवर स्वदेशी जीपीएस उपलब्ध झाले तर आश्चर्य वाटायला नको.