डाव्यांच्या केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपची मुसंडी

केरळ राज्य डाव्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, त्यांच्या किल्ल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. केरळमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाने चांगली कामगिरी केलेय.

PTI | Updated: Nov 7, 2015, 09:29 PM IST
डाव्यांच्या केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपची मुसंडी title=

तिरुवनंतपूरम : केरळ राज्य डाव्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, त्यांच्या किल्ल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. केरळमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाने चांगली कामगिरी केलेय.

केरळात शनिवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये राजधानी तिरुवनंतपूरमच्या महापालिकेतल्या १०० जागांपैकी भाजपाने तब्बल ३५ जागा जिंकल्या आणि महापालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचे स्थान पटकावलेय. त्यामुळे भाजप विरोधी बाकावर बसू शकतो.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे वर्चस्व असलेल्या या महापालिकेत या निवडणुकीपूर्वी भाजपाचे केवळ ६ नगरसेवक होते. यापूर्वी केवळ तिरुवनंतपूरम आणि अर्नाकूलम या दोनच पालिकांमध्ये प्रतिनिधीत्व असलेल्या भाजपने आता कन्नूर वगळता सगळ्या पालिकांमध्ये मुसंडी मारत पालिकेत पाऊल टाकलेय.

कोल्लम आणि अर्नाकुलममध्ये भाजपने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. तर थ्रिसूर ६ आणि कोझिकोडे ७ जागा पटकावत कमळ फुलले आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार ग्रामीण भागात एका पालिकेमध्ये आणि १४ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाने वर्चस्व मिळवलेय. त्यामुळे डाव्यांना हादरा बसलाय.

आत्तापर्यंत कासारगोडू वगळता एकाही ग्रामपंचायतीमध्ये भाजपाला बहुमत मिळाले नव्हते. मात्र, या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत डाव्यांना हिसका दाखवलाय. राज्यात डाव्या पक्षांनी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केल्यामुळे मतदारांचा भ्रमनिरास झाला. त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळेच भाजपला यश मिळाल्याचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांनी म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.