मेरठ : आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराची बातमी आपल्या पतीला दिल्यानंतर महिलेला तिच्या पतीनं फोनवरच तलाक दिल्याची घटना इथं घडलीय.
पीडित महिलेचा विवाह जवळपास पाच वर्षांपूर्वी मुजफ्फरनगर जिल्ह्यातील शाहपूरमध्ये झाला होता. या महिलेला एक अडीच वर्षांचा मुलगाही आहे. दोन वर्षांपूर्वी तिचा पती नोकरीनिमित्त सौदी अरेबियाला गेलाय.
धक्कादायक म्हणजे, आपल्यावर बेतलेली परिस्थिती तिनं पतीसमोर रडत कथन केली... त्यानंतर तिच्या पतीनं फोनवरच तिला तलाख दिलाय.
ही महिला शुक्रवारी रात्री घरी झोपलेली असताना गावातील चौर युवकांनी जबरदस्तीनं तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप या महिलेनं केलाय.
या घटनेची माहिती तीनं आपल्या सासरच्या मंडळींना दिली. त्यांना सोबत घेऊन दुसऱ्या दिवशी तिनं रितसर पोलिसांत तक्रारही दाखल केली. परंतु, अद्याप या गुन्हेगारांवर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही, अशी महिलेची तक्रार आहे.
पतीनं तलाख दिल्यानंतर सासरच्या मंडळींनीही आपल्या मुलाची बाजू घेत आपल्याला घराबाहेर काढल्याचं या महिलेनं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.