www.24taas.com, झी मीडिया, ढाका
आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगला फिक्सिंगचा डाग लागल्यानंतर बीपीएल म्हणजेच बांग्लादेश प्रीमिअर लीगवरही हाच डाग पसरलाय.
बीपीएलमध्ये झालेल्या फिक्सिंग प्रकरणात बांग्लादेशचा खेळाडू मोहम्मद अशरफूल याला निलंबित करण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे अशरफूल याने एकेकाळी बांग्लादेश टीमचं नेतृत्वही केलंय. आयपीएलच्या धर्तीवर बांग्लादेशात ‘बीपीएल’ खेळवण्यात येते.
स्पेशल सेलच्या पकडीत सापडलेल्या नागपूरचा एक सट्टेबाज असलेल्या सुनील भाटियानं एक मोठा खुलासा केला होता. भारताच्या शेजारच्या देश असलेल्या बांग्लादेशातील बीपीएलमध्ये समाविष्ट असलेल्या अनेख खेळाडुंसोबत त्याचे आर्थिक व्यवहार होते. बांग्लादेशी क्रिकेटर मशरेफ मुर्तजा यांनीही आपल्या टीमसमोर ‘टीममधील खेळाडूनंची फिक्सिंगचा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवल्याचं’ सांगितलं होतं. ढाका ग्लेडिएटर्समधून मुर्तजा खेळत आहे. ग्लेडिएटर्सच्या मीडिया मॅनेजर मिन्हाजुद्दीन खान यांनी या वृत्ताला दुजोरा देत ‘आपण या प्रकरणाची माहिती बीपीएलपर्यंत पोहचवल्याचं’ही म्हटलं होतं. य़ावर नक्कीच कारवाई होईल, अशी आशाही मुर्तजा यांनी व्यक्त केली होती. तसंच टूर्नामेंटदरम्यान कोणतीही अनियमितता किंवा संशयास्पद गोष्ट आढळली तर टीमची कॅप्टन्सीही आपण सोडून देऊ असंही त्यांनी म्हटलं होतं.
बीसीबी अध्यक्ष नजमूल हसन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अशरफूलनं फिक्सिंग प्रकरणातील आपला सहभाग स्वीकार केला असल्याचं म्हटलंय. यानंतर अशरफूलला कोणत्याही स्तरावर क्रिकेट खेळू न देण्याची भूमिका बोर्डानं घेतलीय.
आयसीसी एएससीयू बांग्लादेश प्रीमिअर लीग दरम्यान झालेल्या संशयास्पद घटनांची आणि आरोपांची चौकशी करत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.