बंगळूर : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे, 'मेक ऑफ डेव्हलपमेंट इंडिया'साठी मोदी आहेत, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिलीय.
नायडू म्हणाले की, गेल्या वर्षभरात मोदी सरकारचा भ्रष्टाचारमुक्त कारभार सुरू आहे. विविध योजनाही जाहीर करण्यात आल्या असून, विकासकामेही हाती घेण्यात आली आहेत. आज विरोधक 'अच्छे दिन'वर टीका करीत असले, तरी पुढील पाच वर्षांत देशातील चित्र वेगळे दिसेल.
कृषी, शेतमजूर, महिला, गरिबांबरोबरच युवकांसाठीही कार्यक्रम हाती घेतले आहेत. याची पूर्तता करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसार मंत्रालयाने गेल्या वर्षभरात केलेल्या विविध कामकाजाची माहिती देणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन नायडू यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.