मोदी विरुद्ध मोदी!

एनडीएमधला पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललाय. या वादात आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही उडी घेतलीय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं वक्तव्य भाजपच्या सुशील मोदी यांनी केलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 3, 2012, 11:12 AM IST

www.24taas.com, पाटणा
एनडीएमधला पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललाय. या वादात आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही उडी घेतलीय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं वक्तव्य भाजपच्या सुशील मोदी यांनी केलंय.

नितीश कुमार हे देशातल्या एका महत्त्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि एनडीए आघाडीच्या प्रमुख नेत्यांपैकी आहेत. त्यांमुळं आगामी 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची राहणार आहेत असंही सुशील मोदी यांनी नमूद केलंय. मोदींच्या या वक्तव्यावरून भाजपमध्येही पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून अनेक मतप्रवाह असल्याचं पुढं आलंय. तसंच नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीच्या दावेदारीला छेद देण्यासाठीच सुशील मोदींनी वक्तव्य केल्याचं बोललं जातंय.

यापूर्वीही भाजपचे ज्येष्ठ नेत लालकृष्ण अडवाणींनी भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांमधील नेताही पंतप्रधान होऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं. तसंच सरसंघचालक मोहन भागवतांनीही बिहारच्या विकासाचं कौतुक करून नितीश कुमारांवर स्तुती सुमने उधळली होती.