नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर करण्यात आलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखिल सहन झालेले नाही. कारण भाजपचे खासदार गिरीराजसिंह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज असं काही फटकारलं की, गिरीराजसिंह हे ढसाढसा रडले.
भाजपच्या बैठकीत फटकारलं
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींविषयी वक्तव्य केल्याने सोमवारी संसदेत गदारोळ झाल्यानंतर गिरीराजसिंह यांनी माफी मागितली होती. त्यानंतर आज भाजपच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी त्यांना फाटकारले आणि त्यांना या वक्तव्याबाबत स्पष्टीकरणही मागितले. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर गिरीराजसिंह यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांना रडू कोसळले.
स्मृती इराणी यांच्याकडून सांत्वन, मात्र आपण रडलो नसल्याचं गिरीराजसिंह यांनी म्हटलंय
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या त्यांचे सांत्वन करताना दिसले. गिरीराजसिंह यांनी मात्र आपण रडलो नसल्याचे म्हटले आहे.
सोनिया गांधी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याची माफी
गिरीराजसिंह यांनी सोनिया गांधी नायजेरियन वंशाच्या असत्या, तर कॉंग्रेसने त्यांचे नेतृत्व स्वीकारले नसते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरातून टीका होत असतानाच नायजेरियानेही नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी त्यांनी सोमवारी लोकसभेत माफी मागितली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.