नवी दिल्ली : मुंबईस्थित 'जिन्ना हाऊस'च्या सुरक्षेच्या बाबतीत पाकिस्ताननं चिंता व्यक्त केलीय.
भाजपचे खासदार मंगलप्रभात लोढा यांनी 'जिन्ना हाऊस' तोडण्याची भाषा केल्यानंतर पाकिस्ताननं उघडपणे ही भूमिका मांडलीय. 'जिन्ना हाऊस' तोडून त्याऐवजी सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी लोढा यांनी केली होती.
पाकिस्तानचे परदेश मंत्रालयाचे प्रवकेत नफीस जाकारिया यांनी या बाबतीत भारताला उपदेशाचे डोस पाजलेत. सरकारला या ऐतिहासिक इमारतीचं महत्त्व लक्षात घ्यायला हवं, असं त्यांनी म्हटलंय.
सोबतच, पाकिस्तानात फैलावत चाललेल्या दहशतवादी घटनांना भारतच कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलंय. पाकिस्तानात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताकडून फंड उपलब्ध केला जातोय... भारतीय हेर कुलभूषण जाधव याला केलेली अटक याचा पुरावाच असल्याचंही जाकारिया यांनी म्हटलंय.