८ पेक्षा अधिक बनावट नोटा आढळल्यास अटक

५०० आणि १००० च्या नोटा रद्द करत सरकारने भ्रष्टाचार, काळा पैसा आणि बनावट नोटांवर प्रहार केला. पंतप्रधानांच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं. यानंतर आता जर कोणाकडे ८ हून अधिक बनावट नोटा सापडल्यास त्याच्या विरोधात गुन्हा नोंद होणार आहे आणि त्याला जेलची हवा देखील खावी लागणार आहे.

Updated: Nov 11, 2016, 10:58 PM IST
८ पेक्षा अधिक बनावट नोटा आढळल्यास अटक title=

नवी दिल्ली : ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करत सरकारने भ्रष्टाचार, काळा पैसा आणि बनावट नोटांवर प्रहार केला. पंतप्रधानांच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं. यानंतर आता जर कोणाकडे ८ हून अधिक बनावट नोटा सापडल्यास त्याच्या विरोधात गुन्हा नोंद होणार आहे आणि त्याला जेलची हवा देखील खावी लागणार आहे.

५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर बनावट नोटांची टोळी सक्रिय झाली आहे. गर्दीचा फायदा घेत बनावट नोटा चालवण्याचा प्रयत्न होत आहे. अशा वेळेस सतर्क राहण्याची गरज आहे. कारण जर कोणी तुम्हाला पैशांचं आमीष दाखवून तुमच्याकडून नोटा वटवण्याचा प्रयत्न केला तर त्याला बळी पडू नका. बनावट नोटांचं प्रमाण लक्षात घेता सरकारने कोणाकडेही ८ पेक्षा अधिक नोटा सापडल्यास त्याच्याविरोधात गुन्हबा दाखल करुन त्याला अटक करण्याची आदेश देण्यात आले आहेत.

जर एटीएम ट्रांजेक्शनमध्ये 5 पेक्षा अधिक बनावट नोटा आल्यास त्याची माहिती लगेचच बँक आणि पोलिसांना द्यायची आहे. त्याविरोधात तक्रार दाखल करायची आहे.