www.24taas.com, झी मीडिया, कानपूर
तुरुंगातून कैद्यांनी पलायन करण्याचे घटना वारंवार घडत असल्या तरी कानपूर पोलिसांची नाचक्की करणारी एक घटना गुरुवारी घडली. न्यायालयात नेण्यासाठी आलेल्या पोलिस हवालदाराला एका कैद्याने दारु पाजून पलायन केल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेनंतर कानपूर पोलिसांनी संबंधीत हवालदारावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
कानपूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड सुशील श्रीवास्तवला अटक केली होती. सुशीलला गुरुवारी कानपूरमधील सत्र न्यायालयात सुनावणीसाठी जायचे होते. यासाठी सकाळी पोलिस हवालदार वीरेंद्र कुमार हे तुरुंगात गेले आणि सुशील व अन्य एका कैद्याला घेऊन न्यायालयात जायला निघाले. मात्र या दरम्यान सुशीलने पोलिस हवालदार वीरेंद्र आणि अन्य एका कैद्याला भरपूर दारू पाजली.
वीरेंद्र आणि अन्य कैदी मद्यधूंद अवस्थेत असल्याची संधी साधून वीरेंद्रने तिथून पलायन केले. संध्याकाळी न्यायालयात येणा-या कैद्यांची मोजणी झाल्यावर पोलिस हवालदार वीरेंद्र, सुशील व अन्य एक कैदी एक कैदी मद्यधूंद अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसले.
या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी वीरेंद्र सिंहविरोधात कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता झाल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी शोधाशोध केल्यावर न्यायालयापासून काही अंतरावर वीरेंद्र आणि अन्य एक कैदी मद्यधूंद अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसले. या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी वीरेंद्र सिंहविरोधात कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.