३० डिसेंबरनंतर जुन्या नोटा बाळगणाऱ्यांवर होणार कारवाई

५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर आता जुन्या नोटा बदली करण्याची मुदत ही संपत आली आहे. ३० डिसेंबरला शेवटच्या दिवस असणार आहे. त्यानंतर आता अशी माहिती येत आहे की, ३० डिसेंबरनंतर आता जुन्या नोटा ठेवणाऱ्यांवर सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 26, 2016, 10:41 PM IST
३० डिसेंबरनंतर जुन्या नोटा बाळगणाऱ्यांवर होणार कारवाई title=

नवी दिल्ली : ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर आता जुन्या नोटा बदली करण्याची मुदत ही संपत आली आहे. ३० डिसेंबरला शेवटच्या दिवस असणार आहे. त्यानंतर आता अशी माहिती येत आहे की, ३० डिसेंबरनंतर आता जुन्या नोटा ठेवणाऱ्यांवर सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ५०० आणि १००० च्या १० किंवा त्यापेक्षा अधिक नोटा जवळ असल्या तरी ५०००० किंवा रक्कमेच्या ५ टक्के दंड आकारण्यात येणार आहे. या निर्णयासाठी सरकार एक बिल देखील आणणार असल्याचं म्हटलं जातंय.

आरबीआयने असं जाहीर केलं होतं की, ३० डिसेंबरनंतर ३१ मार्च २०१७ पर्यंत रिजर्व्ह बँकेच्या शाखेमध्ये जुन्या नोटा जमा करु शकता. पण यासाठी त्याची माहिती द्यावी लागेल. अशातच ३१ मार्चपर्यंत जुन्या नोटा बदलण्याची मुदतीमध्ये देखील बदल होऊ शकतो. हा निर्णय रद्द देखील केला जाऊ शकतो. याबाबत अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही.