नेहरुंच्या कुटुंबातील पहिल्या परदेशी सुनेचं निधन

नेहरु घराण्याची पहिली परदेशी सून शोभा नेहरू यांचं मंगळवारी निधन झालंय. शोभा नेहरु यांना जगातील सर्वात वयोवृद्ध यहूदी महिलेचाही खिताब मिळालेला होता. 

Updated: Apr 26, 2017, 04:34 PM IST
नेहरुंच्या कुटुंबातील पहिल्या परदेशी सुनेचं निधन title=

सोलन : नेहरु घराण्याची पहिली परदेशी सून शोभा नेहरू यांचं मंगळवारी निधन झालंय. शोभा नेहरु यांना जगातील सर्वात वयोवृद्ध यहूदी महिलेचाही खिताब मिळालेला होता. 

अमेरिकेचे राजदूत तसंच आसाम, जम्मू-काश्मीर आणि गुजरातचे राज्यपाल म्हणून काम पाहिलेल्या बी के नेहरु यांची त्या पत्नी होत्या. त्यांनी 5 डिसेंबर रोजी आपला 109 वा वाढदिवस साजरा केला होता. 

शोभा या मूळ हंगेरीच्या रहिवासी आणि यहूदी होत्या. बी के नेहरु आणि शोभा यांना अशोक, आदित्य आणि अनिल अशी तीन मुलं आहेत... 

जवाहरलाल नेहरुंचे वडिल मोतीलाल नेहरू यांचे मोठे भाऊ नंदलाल नेहरु... नंदलाल यांचा मुलगा बृजलाल... आणि बृजलाल यांचा मुलगा म्हणजे बी के नेहरु... यांच्याशीच शोभा यांचा विवाह झाला होता.  

त्यांच्या अंत्य-संस्कारासाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधी हेदेखील कसौलीत दाखल झाले होते.