महिला प्रवाशावर टॅक्सीतच बलात्कार

महिला प्रवाशावर टॅक्सीतच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली भोपाळ पोलिसांनी टॅक्सी चालकाला अटक केली आहे.

Updated: Jan 5, 2016, 10:13 PM IST
महिला प्रवाशावर टॅक्सीतच बलात्कार title=

भोपाळ : महिला प्रवाशावर टॅक्सीतच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली भोपाळ पोलिसांनी टॅक्सी चालकाला अटक केली आहे.
 
बैरागड ते गांधी नगर रस्त्यावर निर्जन ठिकाणी आरोपीने टॅक्सी थांबवली आणि त्याने महिलेवर बलात्कार केला. 

कुणालाही सांगण्याचा प्रयत्न केला तर, जीवे मारण्याची धमकी त्याने महिलेला दिली होती. पीडित २८ वर्षांची महिलेने घराजवळून ओला टॅक्सी पकडली होती.