दहा रुपयांच्या नाण्यांबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण

दहा रुपयांचं खोटं नाणं बाजारात आल्याचं तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल. मात्र या सा-या अफवा असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय.

Updated: Nov 21, 2016, 08:12 AM IST
दहा रुपयांच्या नाण्यांबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण title=

नवी दिल्ली : दहा रुपयांचं खोटं नाणं बाजारात आल्याचं तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल. मात्र या सा-या अफवा असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय.

चलनात असलेल्या पण रुपयाचं नवं चिन्ह नसलेली नाणी देखील खरी असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय. अनेक दुकानदार, व्यापारी, यांच्याकडून 10 रुपयांची नाणी स्विकारली जात नसल्याची तक्रार आरबीआयला मिळली होती. 

त्यानंतर आरबीआयनं एका सूचनेद्वारे ही नाणी खरी असल्याचा खुलासा केलाय.  नोटाबंदीनंतर देशात आफवांचं पेव फुटलंय त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील आरबीआयनं केलंय.