www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी सरकारमध्ये नवनियुक्तम पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कलम ३७० वर केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेले राजकीय वादळ आता क्षमण्याची चिन्ह कमी दिसत आहेत.
आत यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सुद्धा मैदानात आले आहे. जम्मू कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यावर जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावरून सरकारने स्पष्टीकरण देताना सांगितले की, या मुद्द्यावर नियम आणि कायद्यानुसार भूमिका घेणार आहे.
J&K won't b part of India? Is Omar thinking its his parental estate? 370 or no 370 J&K has been n will always b an integral part of India.
— Ram Madhav (@rammadhavrss) May 28, 2014
जम्मू कश्मींरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुूल्ला यांच्यावर प्रहार करतांना संघाने सांगितले की, कलम ३७० असेल किंवा नसेल, जम्मू-कश्मीर नेहमी भारताचा अविभाज्य घटक आहे आणि पुढेही असेल. ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी ट्वीट मध्ये इशारा देताना कलम ३७० कायम राहील नाही तर जम्मू-कश्मीर भारताचा घटक नसेल.
ओमरच्या ट्वीटला उत्तर देताना संघाचे नेते राम माधव यांनी ट्वीट केला की, ‘जम्मू-कश्मीर भारताचा घटक राहणार नाही? ओमर काश्मीरला आपल्या वडिलांची संपत्ती समजतात का? कलम ३७० असेल किंवा नसेल, जम्मू-कश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे आणि राहील.
So the new MOS PMO says process/discussions to revoke Art 370 have started. Wow, that was a quick beginning. Not sure who is talking 1/n
— Omar Abdullah (@abdullah_omar) May 27, 2014
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.