'सलमान मुस्लिम म्हणूनच मिळाला जामीन'

सलमान खान मुस्लिम आहे... म्हणूनच त्याला जामीन मिळाला, असं धर्मांध आणि विखारी वक्तव्य केलंय साध्वी प्राची हिनं... 

Updated: May 9, 2015, 04:54 PM IST
'सलमान मुस्लिम  म्हणूनच मिळाला जामीन' title=

नवी दिल्ली : सलमान खान मुस्लिम आहे... म्हणूनच त्याला जामीन मिळाला, असं धर्मांध आणि विखारी वक्तव्य केलंय साध्वी प्राची हिनं... 

हिट अॅन्ड रन प्रकरणात अभिनेता सलमान खान याला सेशन कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. २५ हजारांच्या जात मुचलक्यावर सलमानला जामीनही मंजूर करण्यात आलाय. परंतु, सलमानला न्यायालयाकडून मिळालेल्या या स्पेशल ट्रिटमेंटबद्दल त्याच्यावर टीका करण्यात येतेय. 

विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनीही सलमानच्या जामीनाला विरोध केलाय. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या आणि गरिबांची हत्या करणाऱ्याची जागा तुरुंगात असायला हवी, असं साध्वी प्राची हिनं म्हटलंय. 

पण, यासोबतच साध्वी प्राची यांनी सलमान हा एक मुस्लिम आहे आणि म्हणूनच त्याला जामीन मिळालाय, असं वादग्रस्त वक्तव्यही केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.