भोपाळ : भोपाळ सेंट्रल जेलमधून फरार सिमीच्या आठ दहशतवाद्यांना चकमकीच ठार केल्यानंतर आता त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. काँग्रेस, आप आणि असदुद्दीन ओवैसीने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. मध्य प्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी एनआयए करेल अशी माहिती दिली होती. दहशतवादी फरार कसे झाले याची चौकशी होईल पण एनकाउंटर कसं झालं याची चौकशीची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं की, लोकांना शहीद रमाशंकर सिंह यांचं बलिदान नाही दिसत. दोन शब्द शहिदांसाठी देखील बोलले असते. लाज वाटते अशा राजकारण आणि नेत्यांची.
ओवैसींनी एनकाउंटरबाबत म्हटलं की, 'कैदी जेलमधून कसे पळाले. त्याचे फोटो आले आहेत. त्यांनी बुटं आणि जीन्स घातली आहे. क्या जेलमध्ये अंडर ट्रायल कैद्यांना असं ठेवलं जातं. याची चौकशी झाली पाहिजे.'
काँग्रेसनंही या एन्काऊन्टरवर सवाल उपस्थित केलेत. जेलमधून नेहमी मुस्लिम कैदीच कसे फरार होतात याची चौकशी व्हायला हवी अशी अजब मागणी काँग्रेस नेता दिग्विजय सिंह यांनी केली आहे. दहशतवाद्यांकडे हत्यारं होती, अशी माहिती पोलीस महानिरीक्षकांनी एन्काऊन्टरनंतर दिली. पण तुरुंगात असलेल्या दहशतवाद्यांकडे शस्त्रं कशी आली, असा सवाल काँग्रेसनं केला आहे.
तर एन्काऊंटरबद्दल शंका उपस्थित करणं बंद करा असं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी म्हटलं आहे.