www.24taas.com, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नावे एका नव्या विक्रमाची नोंद झालीय. १२७ वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी सलग १५ वर्ष राहण्याचा विक्रम सोनियांच्या नावावर जमा झालाय.
मार्च १९९८ मध्ये त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेतली होती. त्यानंतर सलग १५ वर्ष त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. काँग्रेस पक्ष संघटनेत २००० साली झालेल्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी जितेंद्र प्रसाद यांचा पराभव केला. सध्या अध्यक्षपदाची त्यांची चौथी टर्म सुरु आहे. २०१५ साली सोनिया गांधींचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपणार आहे.
सोनियांच्या नेतृत्वाखालीच यूपीएनं २००४ मध्ये पहिल्यांदा केंद्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर २००९च्या लोकसभा निवडणुकीतही सोनियांनी चांगलं यश मिळवून दिलं.