केजरीवालांना झटका, सुप्रीम कोर्टाची दिल्ली सरकारला नोटीस

Updated: May 29, 2015, 03:27 PM IST
केजरीवालांना झटका, सुप्रीम कोर्टाची दिल्ली सरकारला नोटीस title=

नवी दिल्ली: एसीबीच्या वादाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास बंदी घालण्याचा अध्यादेश जारी केला होता. 

मात्र केंद्र सरकारने जारी केलेली अधिसूचना संशयास्पद असल्याचे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली होती.या प्रकरणी केंद्र सरकारच्यावतीने एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेत उच्च न्यायालयाच्या व्यवस्थेस आव्हान देण्यात आलं होतं.

गृह मंत्रालयाच्यावतीने अतिरिस्त महाधिवक्ता जनरल मनिंदर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात आपल्या याचिकेचा उल्लेख करत सांगितले की, न्यायालयाने याबाबत लवकर सुनावणी करुन संविधानाच्या अनुच्छेद २३९ एएची स्थिती स्पष्ट करावी. त्यामुळे उपराज्यपाल आणि दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ कायम राहील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.