तामिळनाडू सरकारने भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने काल राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करून, त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
राजीव गांधी यांचे मारेकरी २२ वर्षापासून जेलमध्ये होते. या तीनही मारेकऱ्यांनी फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता.
हा दयेचा अर्ज अकरा वर्षापासून राष्ट्रपतींकडे प्रलंबित होता.
अकरा वर्षापासून दयेचा अर्जावर कोणताही निर्णय न झाल्याने, या आरोपींनी आपली फाशीची शिक्षा कायद्यानुसार रद्द करण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.
यावर सर्वोच्च न्यायालयाने काल तीनही आरोपींची फाशीची शिक्षा बदलून, जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
यावर आज झटपट तामिळनाडू सरकारने आदेश देत तीनही आरोपींची मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.