बंगळुरू : गुलबर्गा जिल्ह्यात गणेशमूर्तींच्या विसर्जनाबरोबर एका जिवंत व्यक्तीलाही पाण्यात बुडवून ठार मारण्यात आलंय. हा सगळा प्रकार एका मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झालाय.
धक्कादायक म्हणजे, गणपती विसर्जनासाठी इथं हजारो जण उपस्थित होते. पण, त्यांना मात्र हा धक्कादायक प्रकाराची जराही कुणकुण लागली नाही.
पोलिसांनी एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला होता. विसर्जनादरम्यान खोल पाण्यात गेल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा त्यांचा अंदाज होता. पण, सोशल मीडियातून समोर आलेल्या फुटेजमुळे हा केवळ मृत्यू नव्हता तर खून होता हे स्पष्ट होतंय.
मृत व्यक्तीचं नाव मल्लिकार्जुन असं आहे. तो एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्याच्या खुनाचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विसर्जनादरम्यान तीन-चार जणांच्या टोळक्यानं त्याला जाणूनबुजून पाण्यात बुडवलेलं व्हिडिओमधून समोर येतंय.
दरम्यान, गुलबर्गा पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.