आता पॅन्ट्री नसणाऱ्या ट्रेनमध्येही मिळणार जेवण

 रेल्वेतील पॅन्ट्रीशिवाय असलेल्या रेल्वेत ई- कॅटरिंगची सेवा चालू करणार असल्याचं भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅंड टुरिस्ट कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) नं बुधवारी सांगितलं.

Updated: Jul 23, 2015, 01:00 PM IST
आता पॅन्ट्री नसणाऱ्या ट्रेनमध्येही मिळणार जेवण title=

नवी दिल्ली:  रेल्वेतील पॅन्ट्रीशिवाय असलेल्या रेल्वेत ई- कॅटरिंगची सेवा चालू करणार असल्याचं भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅंड टुरिस्ट कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) नं बुधवारी सांगितलं.

रेल्वेच्या या पुढाकारामुळे सुमारे १३५६ रेल्वे प्रवाशांना फायदा होईल, आशा आयआरसीटीसीनं व्यक्त केली आहे.
सप्टेंबर २०१४मध्ये परिक्षण करण्यासाठी ही सेवा सुरू केली होती. आतापर्यंत संपूर्ण देशातील विविध रेल्वेमध्ये आयआरसीटीसीनं ६००० लोकांपर्यंत जेवण पोहोचवलं होतं. यातील केवळ ३५० प्रवाशांना फास्ट फूड दिले गेले तर बाकीच्यांना पारंपारिक भारतीय जेवण उपलब्ध करून दिलं होतं. हा प्रयोग खूपचं सफल झाल्याचं आयआरसीटीसीनं म्हटलं आहे.
आयआरसीटीसीनं प्रवाशांच्या चवीकडे पण विशेष लक्ष दिलंय.  रेल्वेमध्ये भारतीय जेवणाला जास्त प्राधान्य देण्यावर भर असेल. बीकानेरवाला, पंजाबी ग्रिल, करी किचन, इडली डॉट कॉम सारख्या जेवण पुरवणाऱ्या मोठ्या कंपन्यांबरोबरची बोलणी शेवटच्या टप्प्यात आली आहेत. यामुळे रेल्वेतील जेवणात खूप विविधता मिळेल.
प्रवाशी आयआरसीटीसीला संपर्क करून किंवा वेबसाईटद्वारे आपल्याला आवडणाऱ्या जेवणाची ऑर्डर देऊ शकता.  प्रवाशांना आता जेवणासाठी होणारा त्रास या सुविधेमुळं कमी होईल अशी आशा आयआरसीटीसीनं व्यक्त केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.