अमेरिकेने भरला पाकला सज्जड दम

अमेरिकेने पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या प्रत्येक आर्थिक मदतीवर निर्बंध घालण्यासाठी एक प्रस्ताव सिनेटसमोर मांडण्यात आला आहे. टेक्सासच्या सिनेट सदस्याने हा प्रस्ताव मांडला आहे.

Updated: Sep 27, 2011, 04:51 PM IST

झी २४ तास वेब टीम, वॉशिंग्टन

दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानवर अमेरिका फारच नाराज आहे. त्यामुळे पाकिस्तानला आर्थिक मदत नाकारणे आणि त्यांच्यावर हल्ला करण्यापर्यंतची तयारी अमेरिकेने केली आहे. या संदर्भातील एक प्रस्ताव अमेरिकेत्या संसदेसमोर मांडण्यात आला आहे.

 

अमेरिकेने पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या प्रत्येक आर्थिक मदतीवर निर्बंध घालण्यासाठी एक प्रस्ताव सिनेटसमोर मांडण्यात आला आहे. टेक्सासच्या सिनेट सदस्याने हा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार पाकिस्तानला अणू क्षेपणास्त्राच्या सुरक्षेसाठी तसेच इतर आर्थिक मदतीवरही निर्बंध घालण्यात यावे असे म्हटले आहे. असे झाल्यास नेहमीच आर्थिक विवंचनेमध्ये असणाऱ्या पाकिस्तानची मोठी गोचीच होण्याची शक्यता आहे.

 

[caption id="attachment_1099" align="alignleft" width="300" caption="सिनेटसमोर पाकिस्तानविरूद्भ प्रस्ताव"][/caption]

काबूलमधील अमेरिकी दूतावासावर झालेल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास पाकिस्तान नकार देत असल्यास, तसेच आपल्या या आडमूठ्या भूमिकेवर ठाम राहिल्यास ओबामा सरकारला पाकिस्तानविरूद्ध कठोर पावलं उचलावी लागतील, असे अमेरिकेतील जाणकारांचे मत आहे.

 

दुसरीकडे पाकिस्तानविरूद्ध अमेरिकेचा हालचालीचा अंदाज घेत चीनने पाकिस्तानला प्रत्येक वेळेस मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. चीनचे उपपंतप्रधान मेंग जिंयाझु यांनी पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकारणी नेत्यांसोबत अनेक बैठक केल्या आहेत.