पाककडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे

पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे असल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानकडे सध्या ९० ते १०० अण्वस्त्रे असल्याचे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

Updated: Apr 11, 2012, 02:15 PM IST

www.24taas.com,वॉशिंग्टन

 

 

पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे असल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानकडे सध्या ९० ते १०० अण्वस्त्रे असल्याचे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 
१५० पानांच्या 'एस्युरिंग डिस्ट्रक्शन फॉरएव्हर - न्यूक्लिअर मॉर्डेनायझेशन एराऊंड द वर्ल्ड  'या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानात उच्च दर्जाच्या युरेनियमपासून शस्त्रे बनविलेली आहेत. यामध्ये इंधनावर चालणाऱ्या क्षेपणास्त्रांवर पाकिस्तानचा जास्त भर असल्याचे सांगितले आहे. तयार करण्यात आलेली शस्त्रे ही भारतापेक्षा जास्त आहेत.

 

 

या अहवालात नमुद केल्याप्रमाणे, पाकिस्तान अण्वस्त्रे विकसित करण्यासाठी दरवर्षी सुमारे २.५ अब्ज डॉलर खर्च करते. त्यामुळे पाकिस्तानकडील अण्वस्त्रांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. तसेच पाकिस्तान प्लुटोनियम बनविण्याची क्षमता वाढवित आहे. त्यामुळे पाकिस्तान भविष्यात अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांची चाचणी करू शकेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.