२६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स

२६/११च्या दहशतावादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडली याच्यावर मुंबईतील विशेष न्यायालयानं आरोप निश्चित केलेत. 

Updated: Nov 18, 2015, 04:50 PM IST
२६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स title=

मुंबई : २६/११च्या दहशतावादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडली याच्यावर मुंबईतील विशेष न्यायालयानं आरोप निश्चित केलेत. 

तसंच हेडलीची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवली जावी, ही मुंबई पोलिसांची मागणीही सेशन्स कोर्टातील विशेष न्यायालायनं मान्य केलीय. त्यासाठी आता  डेव्हिड हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी विशेष न्यायालय शिकागो न्यायालयाला समन्स पाठवणार आहे. या समन्समध्ये येत्या १० डिसेंबर रोजी डेव्हिड हेडलीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्षीकरता हजार करावे, अशी विनंती न्यायालयानं केलीय. 

अधिक वाचा - मुंबई हल्ल्याचा आरोपी हेडली याला ३५ वर्षांचा तुरुंगवास

२६/११ रोजी दहशतवादी हल्ल्यात डेव्हिड हेडलीने रेकी करुन महत्त्वाची भूमिका बजावली होती. या दहशतवादी हल्ल्यात सध्या भारतात अबू जुंदालवर खटला सुरु आहे तर हेडली अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांच्या तावडीत सापडलाय. रिचर्ड डेव्हिड हेडली याला अमेरिकेच्या शिकागो न्यायालयाने २६/११ हल्ल्याप्रकरणी ३५ वर्षांची शिक्षा सुनावलीय. सध्या तो अमेरिकाच्या ताब्यात आहे.

अधिक वाचा - `हेडलीनंच घडवला २६/११चा दहशतवादी हल्ला`

अबू जुंदाल आणि हेडली हे २६/११ चे प्रमुख आरोपी आहेत. त्यामुळे अबू जुंदाल सोबतच डेव्हिड हेडलीचीसुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवावी, अशी मागणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात केली होती.

अधिक वाचा - हेडली, राणाला भारताच्या ताब्यात द्या - खुर्शीद

पाकिस्तानी तसंच अमेरिकेचा नागरिक असलेला डेव्हिड हेडली हा लष्कर ए तोयबाचा सदस्यही आहे. त्यामुळे, या प्रकरणात त्याला आरोपी बनवून त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवण्यासाठी न्यायालयाने अमेरिकाच्या न्यायालयाला विनंती करण्याची मागणी मुंबई पोलिसांनी केली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.