ढाका : बांग्लादेश सरकारने भारतातील प्रसिद्ध संगितकार गुलशन कुमारच्या हत्या प्रकरणी दोषी दाऊद मर्चेंट अर्थात अब्दुल रूफ मर्चेंट याला भारताच्या ताब्यात देण्याची हालचाल सुरु केलेय. दाऊद मर्चेंटच्या प्रत्यार्पणामुळे त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
बांग्लादेशचे गृहमंत्री असदुज्जमा कमाल खान यांनी सांगितले, देशात जे परदेशी आरोपी आहेत. त्यांची देशातील तरुंगवासाची शिक्षा संपल्याने त्यांना त्यांच्या देशाकडे सोपविले जाईल. त्यामुळे दाऊद मर्चेंटला प्रत्यार्पण करारानुसार भारताच्या ताब्यात देण्यात येईल. भारतीय दुतावासाला याबाबत माहिती दिली जाईल.
दाऊद मर्चेट याला १९९७ मध्ये गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. त्याची पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर त्याने पलायन केले. तेव्हापासून तो फरार आहे. मे २००९मध्ये त्याला बांग्लादेश पोलिसांनी अवैध देशात घुसल्यापर्करणी अटक केली. २०१४ रोजी त्याला सोडून देण्यात आली. त्यांने वादग्रस्त इस्लामबाबत संदेश दिल्याने त्याला पुन्हा अटक केली.