www.zee24taas.com, वृत्तसंस्था, कराची
पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात काही अज्ञात लोकांनी हिंदू मंदिराला आग लावल्याची हिंसक घटना घडलीय. दरवर्षी १४ एप्रिलला या मंदिरात यात्रेचे आयोजन केले जाते.
यावर्षी यात्राच्या दिवशी मंदिरात पुजा चालू असताना काही लोक तेथे आलेत. त्यांनी प्रथम हनुमानाची मूर्ती तोडून मंदिराला आग लावली असे, स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं की, आग लागल्यानंतर मंदिरात असलेली लोक मदतीसाठी आरडाओरड करत होते तेव्हा मात्र हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. हल्लेखोरांनी चेहरे झाकून ठेवले होते. त्यामुळे त्यांना ओळखता येऊ शकत नाही.
मंदिराच्या याभागात ५०० ते ६०० अनुसुचित जातीचे हिंदू कुटुंब राहतात. त्यांनी शहरात ठिकठिकाणी या घटनेचा निषेध केला. या घटनेनतंर पोलीस स्टेशन अधिकारी यांना निलंबित करण्यात आलंय. याआधी १५ मार्चला पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका धर्मग्रंथाला अपवित्र केल्याचा राग धरून रागावलेल्या लोकांनी एक मंदिर आणि एक धर्मशाळेला आग लावली होती. त्यानंतर जिन्नाबाग आणि आजुबाजूच्या काही परिसरात कर्फ्यू लावण्यात आला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.